विद्यार्थ्यांनो परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करा–पृथ्वीराज पंडित

विद्यार्थ्यांनो परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करा–पृथ्वीराज पंडित
================
माध्यमिक विद्यालय सिरसदेवी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
=================
गेवराई दि.१२(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनो कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन करा. परिश्रमाशिवाय तुम्हाला कांही मिळणार नाही, असे मिळालेले यश आयुष्यभर आपल्याला साथ देते असे प्रतिपादन युवानेते पृथ्वीराज पंडित यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिरसदेवी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना ते बोलत होते.
सिरसदेवी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवानेते पृथ्वीराज पंडित, सरपंच रवींद्र गाडे, उपसरपंच कैलास पवार, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ वाघमारे, जातेगावचे ग्रामपंचायत सदस्य, रामेश्वर चव्हाण, श्रीराम घाटूळ, मुख्याध्यापक अंकुश राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज पंडित म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता विद्यार्थ्यांनी उत्तम चारित्र्य आणि कौशल्याची जोपासना करून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अंकुश राठोड म्हणाले की, परीक्षा ही केवळ कागदावरची नसून ती तुमच्या आत्मविश्वासाची कसोटी आहे, त्यामुळे शांत डोक्याने आणि जिद्दीने यशाला गवसणी घाला. सरपंच रवींद्र बाप्पा गाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न लेखता उच्च ध्येय बाळगावे, गावच्या विकासासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी शिक्षणासारखे दुसरे शस्त्र नाही. राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष दत्ता वाघमारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून फक्त नोकरी मिळण्याचा उद्देश न ठेवता उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. भोसले भाग्यश्री आणि कु. पवार सृष्टी या विद्यार्थिनींनी केले. यावेळी कल्याण सानप, राधाकृष्ण घोडके, प्रमोद पंडित, संतोष ढाकणे, शिंदे सर, शहादेव जाधव, शेख शकील, प्रीतम पवळ, अशोक रोमन, नजीर शेख, वेताळ सर,, पवार सर, उबाळे सर, श्रीमती जायभाय मॅडम.
नामदेव काटकर, शिंदे यांच्यासह सर्व विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



