बीड

गजानन बँकेच्या वतीने केशर ऋण रक्षा निधी योजनेचे धनादेश वाटप

गजानन बँकेच्या वतीने केशर ऋण रक्षा निधी योजनेचे धनादेश वाटप

बीड दि.30 (प्रतिनधी)ः- श्री गजानन नागरी सहकारी बँकेने मयत पगारदार सभासद/ नाम मात्र सभासदांना केशर ऋण रक्षा निधी योजना सुरू केलेली आहे.
सदर योजनेद्वारे वसुलीस मदत होते व त्याद्वारे मयत काळे दीपक देविदास,वंजारे भीमराव बाबुराव व माने दत्तात्रय बाबुराव यांना केशर ऋण रक्षा निधीचे चेक बँकेचे चेअरमन तथा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे हस्ते वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ.शेख एम.एस., व्यवस्थापक विलास कुंबेफळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button