बीड

सोमवार आणि मंगळवारी धनंजय मुंडे घेणार परळी नगर परिषदेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

सोमवार आणि मंगळवारी धनंजय मुंडे घेणार परळी नगर परिषदेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

सोमवारी वॉर्ड क्र. १ ते ८ तर उर्वरित वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले असून, परळी वैजनाथ येथील नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुलाखती घेणार आहेत.

सोमवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वॉर्ड क्रमांक एक ते आठ मधील इच्छुक उमेदवारांच्या तर उर्वरित वॉर्डातील इच्छुकांच्या मंगळवारी अकरा ते पाच या वेळेत मुलाखती घेणार आहेत. या सर्व मुलाखती परळी शहरातील नवीन विशेष शासकीय विश्रामगृह या ठिकाणी होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहतील.

दरम्यान मागील बऱ्याच वर्षांपासून ही नगर परिषद एकहाती धनंजय मुंडे यांच्या ताब्यात राहिलेली असून, गेल्या जवळपास चार वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत.

Back to top button