बीड

29 ऑगस्ट चलो मुंबई मराठा आरक्षणाची आरपारची लढाई.. मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे.. राजेंद्र मस्के

29 ऑगस्ट चलो मुंबई मराठा आरक्षणाची आरपारची लढाई..
मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे.. राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिध:-गेली 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे.
राजकीय हेतूने प्रेरित होऊन शासनकर्ते मराठा आरक्षणाकडे
दुर्लक्ष करत आले आहेत. ओबीसी मधून
मराठा बांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी
मराठा संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील दोन वर्षापासून
सातत्याने संघर्ष करत आहेत.
राज्यात बहुसंख्येने असणारा मराठा समाजाचा विकास खुंटला असून समाजातील तरुणांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. दारिद्र्य व आर्थिक संकटात अडकलेल्या मराठा समाजाला  उन्नतीच्या मार्गावर जाण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. प्रगतीच्या मुख्य प्रवाहात मराठा समाजाला स्थान मिळाले पाहिजे.
न्याय मागणीसाठी दिनांक 29ऑगस्ट 2025 रोजी आझाद मैदान मुंबई येथे मनोज दादा जरांगे पाटील उपस्थितीत आंदोलन होणार आहे. भावी पिढीच्या भवितव्या साठी  मराठा बांधवांनी लाखोच्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी
 डोंगर पाटोदा ता. बीड येथील अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांसी संवाद साधताना केले आहे.
बीड तालुक्यातील पाटोदा (बे) येथे श्रीक्षेत्र नारायण गडांचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शना खाली चौदाव्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नारायण गडाचे नूतन उत्तराधिकारी हभप संभाजी महाराज यांच्या कीर्तनाने झाली. पंडित तुपे व त्यांचे सहकारी अमोल माने,अविनाश बडगे, बाबू माने, चंद्रसेन माने, भरत माने, दादा गोंदवले, गोविंदा गोंदवले, अशोक तुपे, यांच्यासह समस्त गावकरी मंडळींनी खंड हरिनाम सप्ताहाचे यशस्वी नियोजन केले. सांगता समारोप प्रसंगी परिसरातील भावी फक्त बहुसंख्येने सहभागी झाले होते.
Back to top button