बीड

येवता जिल्हा परिषद शाळेत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांच्या हस्ते शौचालय इमारतीचे उद्घाटन संपन्न 

येवता जिल्हा परिषद शाळेत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांच्या हस्ते शौचालय इमारतीचे उद्घाटन संपन्न
आवादा फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून होतेय कौतुक
केज/प्रतिनिधी :-केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद शाळेत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांच्या हस्ते शौचालय इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले आहे तर आवादा फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गेल्या सहा ते सात महिन्यापासून आवादा फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये समर व्हेकेशन तसेच वृक्ष लागवड व शाळेला शौचालय बांधकाम इत्यादी गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित न करता शाळेतील छोट्या मोठ्या बाबीवर लक्ष वेधून शाळेच्या संगणक शिक्षक, गणित, इंग्रजी विषयाचे शिक्षकही खाजगी देण्याचे आवादा फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात उ मागणी ही पूर्ण केली जाईल असे आवादा फाउंडेशनचे दीपक जेना यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
 यावेळी  सरपंच विलास आप्पा जोगदंड यांनी आवादा कंपनीचे आभार मानले व यापुढेही आपले कार्य असेच चालू राहावे अशी विनंती केली तर सयाजी पाटील यांनी आवादा कंपनीचे आभार व्यक्त करत त्यांनी दिलेल्या वास्तूचा वापर चांगल्या प्रकारे करावा जेणेकरून आपण आपल्या घरच्या सारखे ही वास्तू चांगली ठेवावी अशी विद्यार्थाना  विनंती केली. या कार्यक्रमाचे उद्घाटक गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर यांनी बोलताना आवदा फाउंडेशनच्या वतीने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व पुढे बोलताना बिडकर म्हणाले की, केज तालुक्यातील अनेक शाळेला काही ना काही देऊन जिल्हा परिषद शाळेला आवादा फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आधार मिळाला आहे यापुढेही आवादा फाउंडेशनने असेच सहकार्य करावे असे लक्ष्मण बेडस्कर यांनी मत व्यक्त केले.
 याकार्यक्रमाचे समारोप अशोक जोगदंड सर यांनी केला. यावेळी  गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडस्कर,येवता गावचे सरपंच विलास आप्पा जोगदंड, उपसरपंच बाळासाहेब सक्राते,सयाजी पाटील, पत्रकार वसंत सोनवणे, मुख्याध्यापक श्री शिंदे सर,जाधव सर,केदार सर, अशोक जोगदंड सर,रूद्रे सर,सतिष जोगदंड सर, अंबादास काळे सर, कोकाटे मॅडम,व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button