बीड
मंगलाताई सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा

मंगलाताई सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा


माजलगावकरांसाठी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
माजलगाव (प्रतिनिधी):शिक्षण, मातृत्व आणि नेतृत्व यांचे प्रतीक असलेल्या सौ. मंगलाताई प्रकाशदादा सोळंके यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे एक भव्य अभिष्टचिंतन सोहळा आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २० व २१ जुलै २०२५ रोजी करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम लोकनेते सुंदररावजी सोळंके महाविद्यालय,माजलगाव येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर डॉ. प्रकाशराव आनंदगावकर असतील. तर प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती राजश्रीताई हेमंत पाटील (अध्यक्ष, गोदावरी समूह, नांदेड) यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी मा. आ. प्रकाशदादा सोळंके (आमदार, माजलगाव विधानसभा), मा.मोहनरावकाका सोळंके( माजी आमदार), मा. मा. राधाकृष्ण अण्णा होके पाटील( माजी आमदार), मा. बाजीराव जगताप ( माजी आमदार), मा. जयसिंग सोळंके, डॉ. आर.जी.बजाज , मा. विरेंद्र सोळंके, बाबुराव पोटभरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमातील सत्कारमूर्ती सौ. मंगलाताई प्रकाशदादा सोळंके या माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून मराठवाड्यात अनाथांची माऊली अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव या प्रसंगी करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. या कार्यक्रमात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेचा एक महत्वपूर्ण संदेश देण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ वाजता थिएटर ऑफ रेलेव्हन्स तर्फे “द अदर वर्ल्ड” हा मराठी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तसेच २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता गझल संध्या या गझल गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. दुर्गेश सोनार (मुंबई) असतील तर दत्तप्रसाद जोग, अमिता पैठणकर, आबेद शेख, आत्माराम जाधव, अविनाश काठवटे असे नामांकित गझलकार उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर हे करणार आहेत.
आयोजनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार असून, समाजसेवेचा आदर्श ठरलेल्या मंगलाताई सोळंके यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.



