📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

पालिकेकडून सेलू शहरातील मान्सून पूर्व सफाई कामास शूभारंभ.

पालिकेकडून सेलू शहरातील मान्सून पूर्व सफाई कामास शूभारंभ.
प्रतिनिधी :-सेलू शहरात अनेक भागातून मोठे नाले  आणि गल्लीतील नाल्या , रोडच्या बाजूस असलेले काटेरी झाडे यांची साफसफाई पावसाळ्या पूर्वीची काम नगर पालिके कडून करण्यास आज मुख्याधिकारी यूवराज पौळ यांच्या  मार्गदर्शनाखाली आज सकाळी शूभारंभ करण्यात आला.
सेलू शहरातील काही भागात नाले आणि गल्लीतील नाल्यात गाळ साचलेला असतो , अनेक भागात काटेरी झाडे , कचरा, या मूळे पावसाळ्यात शहरात अनेक भागात पाणी जमा होऊ नये या साठी सेलू नगर पालिके कडून मान्सूनपूर्वची काम सूरू करण्यात आले असून शहरात जि.सि.बी तसेच पोकलॅन च्या सहाय्याने विद्या नगर, छञपती शिवाजी नगर, दत्त नगर, गायञी नगर, लक्कड कोट राजीव गांधी नगर या भागातील मोठ्या नाल्यातील पूर्ण साफसफाई करण्यात येत असून या साफसफाई कामा मूळे शहरात पावसाळ्यात शहरातील नागरीकांना ञास होनार नाही याची दक्षता पालिचे कडून घेण्यात येत आहे, साफसफाई नाले,गल्लीतील नाल्या, शहरातील जागोजागी काटेरी झाडे, यांची पूर्ण सफाई करण्यात येनार असल्याची माहीती सेलू नगर पालिके कडून दै.दिलासाची बोलतांना देण्यात आली,
या वेळी यूवराज पौळ,(मुख्याधिकारी) श्री काशिनाथ धूळगंडे स्थापत्य अभियंता
ज्ञानेश्र्वर पारसेवार ( स्वच्छता निरीक्षक) ज्ञानेश्र्वर काकडे ( स्वच्छता निरीक्षक) कैलास कापूरे, खंडू चव्हाण आदीची उपस्थीती होती.
Back to top button