शुक्रवारी बीडमध्ये जरांगे पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक

शुक्रवारी बीडमध्ये जरांगे पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठ
बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहा
बीड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजवल्या इतिहासातून प्रेरणा घेऊन येणारी पिढी चरित्र्यसंपन्न व सामर्थ्यशाली बनावी या हेतूने नवीन शैक्षणिक धोरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा या महत्वपूर्ण मागणी सोबतच, मराठा समाजातील विद्यार्थ्यां व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार समोर मांडून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी (ता. २८) संध्याकाळी सहा वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय बीड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्ह्यातील शिक्षक, वकील, डॉक्टर इंजिनिअर सर्व कर्मचारी व समजबंधव संघटनेने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. यांच्या उपस्थितीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार असून नेमकं या बैठकीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा समाजाने या मेळाव्यास एक दिवस जातीसाठी या उद्देशाने समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने केले आहे.



