
कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
नेकनूर (प्रतिनिधी) : प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढास डी.के. हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मिथुन जोगदंड कायदे विधीदुत बीड हे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रामरुले डी.के. प्रमुख पाहुणे श्री मिथुन जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कायदे विषयी न्याय विषयी मार्गदर्शन केले त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांना रॅगिंग विषयी तसेच आपल्याला चार हक्क स्वतःचे संरक्षण करणे, शिक्षण घेणे, आपले मत मांडणे इत्यादी जर याची पायमल्ली होत असेल तर आपण हेल्पलाइन नंबर ला फोन करून माहिती द्यावी असे सांगितले तदनंतर विद्यार्थ्यांना पोम्प्लेट वाटप करून न्यायाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संबोधित करताना प्राचार्य डॉ. ढास डी.के.यांनी न्यायाने कायदे विषयी विद्यार्थ्यांनी अवलोकन करावे व तुमच्या अधिकारावर कुठं गदा येत असेल तर प्राचार्यांशी संपर्क साधावा असे सांगितले तसेच हेल्पलाइन नंबर वर फोन करावा असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.इनकर व्ही.एस. यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



