बीड
आदित्य कृषी महाविद्यालयात २६० विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

—
बँकिंग परीक्षांची भीती सोडा, यशाचे मार्ग सोपे होतील : सिद्धेश्वर कोगे
बीड | प्रतिनिधी
शहरातील आदित्य कृषी महाविद्यालयात ‘बँकिंग क्षेत्रातील करिअर संधी आणि कृषी पदव्युत्तर शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ‘अल्फा कोचिंग’ (छत्रपती संभाजीनगर) चे संचालक व बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर कोगे म्हणाले विद्यार्थांनो बँकिंग परीक्षांची भीती सोडा, यशाचे मार्ग सोपे होतील. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध पदे, स्पर्धा परीक्षांची रचना आणि तयारीची रणनीती यावर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी २६० विद्यार्थी उपस्थित होते.
आदित्य शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक आलेख उंचावत आहे. याचाच भाग म्हणून, स्पर्धा परीक्षांची अचूक रणनीती हा विद्यार्थांसाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘अल्फा कोचिंग’ (छत्रपती संभाजीनगर) चे संचालक व बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर कोगे (एम.एस्सी. अॅग्री इकॉनॉमिक्स) आणि मॅनेजर संजीत कदम उपस्थित होते. कोगे यांनी विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम मनातील अभ्यासाची, विशेषतः गणित व इंग्रजी विषयांची भीती काढून टाकणे आवश्यक आहे. ही भीती नष्ट झाल्यास यश मिळवणे कसे सोपे होते, हे त्यांनी विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत गणिताचे प्रश्न सोडवून घेतले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला. विद्यार्थ्यांनी बँकिंगसह कृषी क्षेत्रातील इतर स्पर्धा परीक्षांनाही प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम भुतडा यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने स्पर्धात्मक वातावरणात घडवले जाते, याचा आढावा घेतला. भविष्यातही येथील विद्यार्थी विविध उच्च पदांवर चमकतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या शिबिराला सहाव्या व आठव्या सत्रातील तब्बल २६० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधींची स्पष्ट दिशा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा एडके यांनी केले, तर चोख नियोजन डॉ. राम मोरे यांनी सांभाळले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
—
संस्थेचे योगदान कौतुकास्पद!
आदित्य कृषी महाविद्यालयाचा भव्य कॅम्पस आणि विद्यार्थ्यांमधील कलागुण कौतुकास्पद आहेत. माजी विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांत झालेली निवड, हे आदित्य शिक्षण संस्थेच्या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि मोठ्या योगदानाचे प्रतीक आहे.
-सिद्धेश्वर कोंगे, संचालक, अल्फा कोचिंग, छत्रपती संभाजीनगर.