बीड

श्री राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

श्री राधाकृष्ण मंदिर वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

म्हसळा  | प्रतिनिधी : संदेश घोलप
म्हसळा तालुक्यातील खामगांव गौळवाडी खालची आळी येथे श्री राधाकृष्ण मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे आयोजन खामगांव गौळवाडी खालची आळी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, राधाकृष्ण युवा मित्र मंडळ (मुंबई कमिटी), श्री राधाकृष्ण मंदिर कमिटी आणि राधाकृष्ण महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
बुधवार दि. १३ मे २०२६ रोजी सकाळी पालखी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मिरवणुकीसाठी प्रसाद वाटप करण्यात आले. गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी व्यासपूजन, प्राथमिक पूजा तसेच विविध धार्मिक विधी पार पडले. यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. दुपारी महाआरती व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
महिलांसाठी विशेष हळदीकुंकू कार्यक्रम तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ग्रामस्थांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले.
या सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, भाविक आणि महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ व युवा मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
खामगांव गौळवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ (खालची आळी) व श्री राधाकृष्ण मंदिर कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, उपाध्यक्ष पांडुरंग गायकर, सचिव आदर्श कांबळे, उपसचिव आश्वेश कांबळे, खजिनदार गणेश महाडीक, उप खजिनदार रोशन कांबळे, कार्याध्यक्ष महेंद्र गायकर, उप कार्याध्यक्ष मनोज गायकर, हिशोब तपासनीस सुभाष लटके, सल्लागार अशोक कांबळे, संभाजी कांबळे, प्रदीप कांबळे, सुरेश बिरवाडकर, शंकर बिरवाडकर, श्याम कांबळे, रुपेश गायकर, सदस्य राम लाड, राम कांबळे, सुनिल गायकर, प्रशांत गायकर, मितेश गायकर, बबलु लटके महिला मंडळ अध्यक्षा यांनी संपूर्ण दोन दिवस कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊन मंदिर बांधण्याच्या प्रस्तावापासून ते मंदिर पूर्ण होईपर्यंत खूप मेहनत घेतली.

Back to top button