📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अशियान तायक्वांन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सोहेल शेख यांचा डिप्लोमा कॉलेज येथे सत्कार

अशियान तायक्वांन स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सोहेल शेख यांचा डिप्लोमा कॉलेज येथे सत्कार

डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक पटकावले हे अभिमानास्पद – प्रा.विकी घायतडक

जामखेड प्रतिनिधी;-डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी जामखेड कॉलेजच्या विद्यार्थ्यांने सुवर्णपदक पटकावले हे अभिमानास्पद आहे.असे गौरवोद्गार प्राचार्य विकी घायतडक यांनी काढले.

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे द्वितीय वर्ष काॅम्प्युटर संगणक अभियंता या शाखेत शिक्षण घेत आहे .बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या अशियान तायक्वांन स्पर्धेत
पाच खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले असून या स्पर्धेतील सोहेल रियाज शेख याचा आज रोजी प्राचार्य विकी घायतडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी दैनिक सुर्योदय चे उपसंपादक धनराज पवार,प्रा.किशोर हुंबे,प्रा.जयसिंग पवार,प्रा. राहिल शेख,प्रा.स्नेहल भोगे,प्रा.शुभदा भोज ,प्रा.पूनम कांबळे,प्रा.आश्विनी पोटफोडे,प्रा. दुलारी परदेशी,प्रा.माधुरी म्हेत्रे, सिनिअर क्लर्क सविता सुतार, अधिक्षक संतोष डहाळे, संतोष जगताप,प्रतिक उदारे,सौरभ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सोहेल शेख यांस अशियान तायक्वांन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Back to top button