📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीवर्धन / दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खळबजनक घटना: ६१ वर्षीय महिला अपहरणाप्रकरणी पोलिसांचे शोधपत्रक जारी; नागरिकांना मदतीचे आवाहन

श्रीवर्धन / दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खळबजनक घटना: ६१ वर्षीय महिला अपहरणाप्रकरणी पोलिसांचे शोधपत्रक जारी; नागरिकांना मदतीचे आवाहन
श्रीवर्धन (संदेश घोलप):
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतून एक ६१ वर्षीय महिला रहस्यमयी रितीने अपहरित झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘शोधपत्रक’ जारी केले असून, महिलेचा शोध घेण्यासाठी नागरिकांच्या मदतीचे आवाहन केले आहे.
घटना नेमकी काय?
दिघी सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार (गु.रं.नं. १२३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४० (३) प्रमाणे), अपहरित महिलेचे नाव मथाली जानू भोपी (वय ६१ वर्षे, रा. नानवली, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) असे आहे.
दिनांक १२/०९/२०२६ रोजी रात्री १०:०० वाजता ते दिनांक १३/०९/२०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजताच्या दरम्यानच्या सुमारास, अज्ञात आरोपीने या वृद्ध महिलेचे कुणालाही न सांगता किंवा बळजबरीने अपहरण केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन:
अपहरित झालेली महिला मथाली जानू भोपी यांचा शोध घेण्यासाठी दिघी सागरी पोलीस कसून तपास करत आहेत. सदर महिला अथवा तिच्याबाबत कोणतीही महत्त्वाची माहिती वा सुगावा मिळाल्यास तात्काळ खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे:
 * श्री. संतोष आवटी (सहा. पोलीस निरीक्षक) – ९६५७३१८२५५
 * श्री. बी.जी. गच्छे (पोलीस उप निरीक्षक, दिघीसागरी पोलीस ठाणे) – ८९९९०६२३०१
 * दिघीसागरी पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक – ०२१४७-२२४३०७

Back to top button