बीड

मयुरीताई बांगर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड जाहीर 

मयुरीताई बांगर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड जाहीर
बीड प्रतिनिधी
बीड येथील सामाजिक कार्यकर्त्यां मयुरीताई बांगर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या राजकारण विकास समिती च्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात अली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष बीबी वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख, प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंखे पाटील, प्रदेश सचिव गणेश जगदाळे,प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण, सहसचिव सुनील महाकुंडे, प्रदेश उपाध्यक्ष वसीम आजाद, अनिस कुरेशी, साजेद सय्यद, श्रद्धा कंडूडे, प्रदेश उपाध्यक्ष, युवा प्रदेश अध्यक्ष किशोर पवार,शुभांगी पाटील यांच्या आदेशानुसार  प्रदेश उपाध्याक्ष तथा भाजपा बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील,  नवनियुक्त नगरसेवक अँड गोविंद शिराळे बीड नं. प.,  माजी नगरसेवक बाबुराव परळकर,बीड जिल्हा संघटक संजय कुलकर्णी, बीड जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी च्या तक्षशिला सोनवणे,राजू अडागळे आदीच्या उपास्तीत निवड जाहीर करण्यात अली आहे.
मयुरीताई बांगर ह्या अनेक वर्ष्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करीत असून आता लवकरच बीड जिल्ह्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात भरीव असे योगदान देणार आहेत. प्रत्येक गावागावात जाऊन उद्योग क्षेत्रात प्रत्येक महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन त्यांना सहकार्य करणार आहेत. त्यांच्या उद्योगाचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग करणार असून पहिल्यांदाच बीड मध्ये उद्योग अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय कारकीर्द मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या निवडी मुळे सर्व स्तरातून मयुरीताई बांगर यांचे अभिनंदन होतं आहे.
Back to top button