विकसित भारत युवा संसद 2027 कार्यक्रमाचे शानदार उदघाटन संपन्न

माय भारत केंद्र बीड, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय बीड व आदर्श शिक्षण संस्था बीड संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळनेर (ग.) ता. बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संसद 2027 हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला.
“युवा शक्ती – लोकशाहीची ऊर्जा, संविधानाचा सन्मान आणि विकसित भारताचा संकल्प”. भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता असलेल्या युवा शक्तीशी संवाद साधण्यासाठी उभा आहे. असे मत छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी मांडले. यावेळी व्यासपीठावरती माय भारत युवा कार्यालयाचे जिल्हा युवा अधिकारी श्री सागर उज्जैनकर, पिंपळनेर येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भांडवलकर, तेजश्री वावरे मुख्यमंत्री दूत – जिल्हाधिकारी कार्यालय बीड उपस्थित होते.
आदर्श शिक्षण संस्था बीड संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पिंपळनेर (ग.) आणि जिल्हा युवा अधिकारी, माय भारत (मेरा भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विकसित भारत युवा संवाद 2027 अंतर्गत सशक्त भारतासाठी नशा मुक्त युवक या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ‘विकसित भारत युवा संसद’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तरुणांच्या विचारांना दिशा देणारा, नेतृत्वगुणांना वाव देणारा आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आपण अनेकदा म्हणतो की भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. पण लोकशाहीची खरी ताकद केवळ निवडणुकांमध्ये नसते, तर
लोकशाहीची खरी ताकद असते ती विचारस्वातंत्र्यात, मतभिन्नतेचा आदर करण्यात, चर्चेतून निर्णय घेण्यात आणि प्रत्येक नागरिकाच्या सहभागात असे मत सागर उज्जैनकर यांनी मांडले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. मिरगणे यांनी युवकांच्या जीवनातील व्यसनांचे दुष्परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक व कौटुंबिक समस्या आणि त्याचा देशाच्या भवितव्यावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले. व्यसनमुक्ती ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून सामाजिक चळवळ बनली पाहिजे. युवकांनी शिक्षण, क्रीडा, संशोधन, कौशल्यविकास आणि सामाजिक कार्य यांना प्राधान्य देऊन स्वतःच्या क्षमतेचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. बाळासाहेब भांडवलकर यांनी अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला, वैचारिक प्रगल्भतेला आणि सामाजिक जाणीवेला चालना मिळते. युवकांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प करून विकसित भारताच्या वाटचालीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे मत व्यक्त केले.
या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु.जेथलिया भाग्यश्री सतीशकुमार, द्वितीय क्रमांक कु.इंगळे भारती भागवत, तृतीय क्रमांक चि.वाघमारे सिद्धार्थ यांनी अनुक्रमे पारितोषिके प्राप्त केली. तसेच कु.शेळके प्रतीक्षा प्रकाश, कु.जानवळे श्रद्धा संजयराव, चि.आतकरे आर्यन राजेश, कु.राठी माणशी रवींद्र, कु.लोकरे स्वरा गोरख यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेमोटो देण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. अमर आलदे, प्रा. डॉ. रमेश लाहोटी, प्रा. डॉ. अरुण दैतकर पाटील, प्रा. डॉ. रोहिणी जोशी आणि प्रसिद्ध कवी प्रा. पंजाबराव येडे या सर्वांनी उत्तम काम पाहिले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून सुमारे 69 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी व्यसनमुक्ती, युवकांची सामाजिक जबाबदारी, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारत या विषयांवर प्रभावी विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मदन काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पी. आर. वाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्रा.दत्ता घुमरे, प्रा. धनंजय जाधव, श्री. बालासाहेब शिंदे, श्री. कल्याण शिरसट, प्रा. विनायक चोपडे श्री. दत्ता इतापे, रोहन साळुंके, माय भारत बीड कार्यालयाचे स्वप्नील बगाडे, तत्वशील कांबळे, युथ आयकॉन आशिष वारे, प्रमोद जव्हेरी, नंदिनी रायकर, समाजसेवक बाजीराव ढाकणे, लक्ष्मण मळेकर, डॉ. संदीप संपाळ, डॉ. संजय जानवळे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
‘नशामुक्त युवा – समर्थ भारत’ हा संदेश देणारी ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरली.



