महाराष्ट्र

भाऊबीजेची ओवाळणी म्हणून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत द्या

 

राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक हवालदिल झालेला असताना वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे त्यात वाढत्या सिलेंडर दरवाढीमुळे गृहिणीचे घराचे बजेट सुद्धा बिघडलेले दिसून येत आहे. त्यात पुन्हा एकदा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये १५ रुपयांनी वाढ झाल्याने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राज्यात आंदोलन करण्यात येणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. खाद्यतेलांच्या किंमती ऐन दिवाळीत दिवाळीत वाढल्या. भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेलांच्या किंमतींवर दिवाळी सणासाठी ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी या पत्रातून केली.
.
महागाईने उच्चांक गाठला असून ऐन दिवाळीत संक्रात ओढावली आहे. यासाठी दिवाळीच्या पाच दिवसात गॅस सिलेंडरच्या किंमती, खाद्य तेल आणि डाळींच्या किंमतीत ५० टक्के सवलत देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी असे रुपाली चाकणकर यांनी पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणाऱ्या पत्राविषयी रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत, उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

 

Back to top button