राजकीय

आम्ही अफु-गांजा पिकवूनच आमच्या टेरेसवर ठेवतो

 

राज्यात एकीकडे आर्यन खानच्या खटल्यावर सुनावणी सुरु असून दुसरीकडे एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात वाद पेटला आहे. मलिक सतत पत्रकार परिषद आणि ट्विटच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर टीका केली आहे.आता याच प्रकरणावरून संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राऊत म्हणाले की, जणुकाही महाराष्ट्रात अफु गांजाचीच शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्चीवर टेरेसवरच ठेवतो, असं सुरु आहे. या प्रकरणात कुणी विचारलं तर केंद्रातील मोदी सरकार त्याला झेड प्लस सुरक्षा देतं’, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोंधळावरून संजय राऊतांनी ही संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

याशिवाय ते म्हणाले, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या लोकांनाच केंद्र सरकार 36 लोकांची झेड प्लस सुरक्षा पुरवत आहे. यातुन केंद्र सरकार त्यांचा सन्मान करत असल्याचंच उघड होत आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. याव्यतिरिक्त ‘झेड प्लस सुरक्षा पुरवली म्हणजे चौकशी होणार नाही, असं नाही. समीर वानखेडे यांची चौकशी होणारच’, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

Back to top button