संपादकीय

बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंचांचे पद रद्द करा, चाकणकरांची थेट मुख्यामंत्र्यांकडे मागणी

राज्यात आजही छुप्या पद्धतीने बाल विवाह होत असल्याचे अनेकदा निर्दशनास आले होते याच विरोधात अनेक महिला संघटनांनी आक्रमक भूमिका घेत बाळ विवाह प्रथा बंद पाडण्याची मागणी केली होती. त्यातच आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी थेट या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. ‘बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास स्थानिक अधिकारी, सरपंच यांचे पद रद्द करावे. तसेच याबाबतचा नवीन नियम लागू करावा,’ अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाढते बालविवाह रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पाठविण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रथमच अशा स्वरूपात निर्णय घेतला असून, आपल्या सर्वांच्याच सहकार्याने हा निर्णय यशस्वी होईल याची खाञी वाटते.

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता सदरचे या नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच, विवाह नोंदणी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांची जबाबदारी निश्चित करावी. त्यानंतर अशा प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावेत.

Back to top button