राजकीय

राज्यात घाणेरडं राजकारण ज्यांनी सुरू केलंय हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार” राऊतांचा हल्लाबोल

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्र अनिल देशमुख यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली आहे.त्यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राज्यात घाणेरडं राजकारण ज्यांनी सुरू केलंय हे त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार असे सांगत त्यांनी आरोप करणाऱ्यांना पळून जाण्यास केंद्राचं पाठबळ मिळतं आणि ज्याच्यावर आरोप झालेत तो चौकशीला हजर राहिल्यावर अटक होते आहे,’ असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईला पाहून भाजपाचे नेते टणाटणा उड्या मारतायेत. दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू म्हणत आहेत. पण तेव्हा यांना बाथरूममध्ये स्वतःची तोंडं लपवून बसावं लागेल, असा इशाराही दिला. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पळून गेलेले नाहीत, तर त्यांना पळवून लावलं आहे. कुणीही देशाबाहेर पळून जातो तो केंद्रातील सरकारच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईचा पोलीस आयुक्त राहिलेला एक अधिकारी, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा देश सोडून जातो तेव्हा त्याला केंद्राचं संपूर्ण पाठबळ असतं. त्याशिवाय तो जाऊच शकत नाही. त्यांनी आरोप केला आणि पळून गेला. त्याच आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास संस्था तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक करतात. चौकशी, तपास होऊ शकतो, पण ईडीला भेटल्यानंतर लगेच अटक करण्यात आली. हे सर्व ठरवून चाललं आहे

Back to top button