आरोग्यबीडब्रेकिंग

पुस वीस खेडी योजना पुन्हा तीन दिवसापासून बंद
11 गावामध्ये अशुध्द पाणी पिण्याची नागरीकांवर वेळ, कंत्राटदाराचे बील थकल्याने कामगार संपावर


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :
अंबाजोगाई परळी तालुक्याची तहाण भागविणार्‍या पुस वीस खेडी योजनेवर मागील दुष्काळाच्या काळामध्ये दोन्ही तालुक्याची तहाण भागविली होती. हीच योजना आज कंत्राटदाराच्या बीलामुळे बंद पडली आहे. नवरात्र उत्सव तोंडावर आला असताना ही पाणीपुरवठा योजना पगारीमुळे कामगारांनी बंद ठेवल्यामुळे नागरीकामध्ये असंतोष व्यक्त होत आहे. तसेच पाऊसाने हाहाकार.. माजविला असल्याने गावकर्‍यांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गटामध्ये व पालकमंत्र्याच्या मतदार संघामध्ये ही महत्वपूर्ण योजना दोघांच्या दुर्लक्षामुळे बंद पडली आहे. याचा सामना नागरीकांना करावा लागत आहे.


तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी अंबाजोगाई परळी तालुक्यातील नागरीकांची तहाण भागविणारी ही एक पुस वीस खेडी योजना कालमर्यादा संपल्यामुळे डबघाईला आली होती. ही योजना पुर्नजीवीत करण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पाणी पुरवठा मंत्र्याकडून ही योजना पुर्नजीवीत करण्यासाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन घेतला या निधीतून ही योजना पुर्नजीवीत झाली. या निवेदेमध्ये संबंधीत योजना पुर्नजीवीत करुन दोन वर्ष चालविण्याची अटी शासनाने टाकल्या होत्या परंतु सरकार बदलल्याने जुण्या निवेदेचा निधी देण्यासाठी आकडता हात घेतला त्यामुळे ही योजना सु-व्यवस्थीतपणे चालु शकलेली नाही. ग्रामीण भागामध्ये नवरात्र उत्सव आल्यानंतर घरातील कपडे, भांडी धुण्याची पध्दत आजही ग्रामीण भागामध्ये सुरु आहे. परंतु ही योजना बंद पडल्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अध्यक्ष व पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मतदार संघातील आपले कांही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माझ्या मतदार संघातील नागरीक पिण्याच्य पाण्यापासून वंचित राहीले नाही पाहीजे या उदात्त भुमीकेतून ही योजना पुर्नजीवीत केली. परंतु आताच्या मतदार संघातील तर सोडा जिल्हयामध्ये शेतकरी परतीच्या पावसाने संपूर्ण नागावला गेला आहे. जिल्हयातील समस्याकडे सत्ताधारी नेत्यांना लक्ष दयायला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.


संबंधित योजना पुर्नजिवित करुन ती योजना दोन वर्षे चालविण्याचे कंत्राट कृष्णा इंन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड कन्सलटंसी या एजन्सीला 1 कोटी 43 लाख रुपये चे कंत्राट एम.जी.पी.ने दिले होते. संबंधित एजन्सीने पुर्नजिवनाच्या कामासह योजना चालवण्याचे काम मागील एक वर्षापासून चालू आहे. परंतु कोरोना काळामध्ये शासनाने संबंधित एजन्सीचे बिल थकवून ठेवल्यामुळे त्यांचे कामगार पगारीमुळे संपावर गेले आहेत. सणासुदीच्या काळातच ही योजना बंद ठेवणे हे राजकीय पदाधिकार्‍यांना योग्य वाटते का असा प्रश्न नागरीकातून उपस्थित होवू लागला आहे.
बील थकल्याने कामगार संपावर


पुस वीस खेडी योजनेच्या पुर्नजिवनाचे काम आमच्या एजन्सीला मिळाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अटीप्रमाणे आम्ही काम पुर्ण केले आहे. ही योजना चालविण्यासाठी कामगाराचे वेतन शासनाकडून मिळाले नसल्यामुळे अडचण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
जिल्हा परिषद अध्यक्ष नॉट रिचेबल


घाटनांदूर जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवकन्या सिरसाट या जिल्हा परिषद अध्यक्षा झाल्या विशेष म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघातील महत्वपुर्ण योजना दोघांच्या उदासिनतेमुळे बंद पडली आहे. पालमंत्र्याच्या एका फोनवर कंत्राटदाराचे बील मिळणे शक्य आहे. परंतु त्याना कंत्राटदारांचे देणे नाही व नागरीकांचे देणे नाही. या बाबत जि.प. अध्यक्षांना फोन केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल आला. आपल्याच मतदार संघामध्ये मागील दोन महिन्यापासून या योजनेला लागलेेले ग्रहण सोडवण्यासाठी का प्रयत्न केला नाही हे विचार करण्यासारखे आहे.

Back to top button